-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १८ मार्चपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे ‘जानकी रणदिवे’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून कोणाची वर्णी लागणार याबद्दल गेले अनेक दिवस चर्चा चालू होत्या.
-
अखेर ‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये हृषिकेश रणदिवेची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे.
-
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सुमीत पुसावळे स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
-
जानकी रणदिवे म्हणजेच रेश्माच्या ऑनस्क्रीन लेकीच्या भूमिकेत बालकलाकार आरोही सांबरे झळकणार आहे.
-
अभिनेत्री सविता प्रभुणे या मालिकेत जानकीच्या सासूबाईंची भूमिका साकारणार आहेत.
-
बालकलाकार आरोहीच्या नाना आजोबांच्या भूमिकेत प्रमोद पवार झळकणार आहेत.
-
याशिवाय अभिनेता उदय नेने मालिकेत सारंग ( जानकीचा लहान दीर) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे अभिनेता आशुतोष पत्की घराघरांत लोकप्रिय झाला होता. तो आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत सौमित्र हे पात्र साकारणार आहे.
-
‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर देखील या नवीन मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारेल.
-
मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार प्रतीक्षा “घरोघरी…” मालिकेत पुन्हा एकदा खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे.
-
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे या मालिकेत आजीच्या भूमिकेत झळकणार आहेत.
-
अभिनेता अक्षय वाघमारे व अभिनेत्री भक्ती देसाई हे दोन कलाकार देखील मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
-
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका येत्या १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी व रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम पेज )
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच