-
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ हा सोहळा नुकताच दिमाखात पार पडला.
-
स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती.
-
रेड कार्पेटवरचा सर्वच कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधून घेणारा होता.
-
‘वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट’ अशी यंदाची थीम असल्यामुळे कलाकारांच्या एकापेक्षा एक पेहरावाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
-
अर्जुन, सायली, गौरी, जयदीप, जानकी, आकाश, भूमी असे सगळेच कलाकार अनोख्या अंदाजात रेड कार्पेटवर आले होते.
-
पुरस्काराचं औचित्य साधून यावेळी स्टार प्रवाहच्या मराठी दिनदर्शिकेचं अनावरण करण्यात आलं.
-
परंपरेचं प्रतिक असणारी ही मराठी दिनदर्शिका प्रवाह कुटुंबातील कलाकारांच्या मराठमोळ्या अंदाजाने सजली आहे.
-
स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते.
-
रविवारी १७ मार्चला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर हे पुरस्कार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
-
यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.
-
थीमप्रमाणे परिधान केलेल्या कपड्यांमुळे प्रत्येक कलाकाराचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, १७ मार्चला रविवारी संध्याकाळी ७ वाजता या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण प्रवाह वाहिनीवर करण्यात येणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह )

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल