-
‘शेप ऑफ यू’, ‘परफेक्ट’ अशा लोकप्रिय गाण्यांनी चाहत्यांचं मन जिंकणारा जगप्रसिद्ध गायक Ed Sheeran भारतात नक्की करतोय तरी काय? असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
-
भारतात आल्यानंतर Ed Sheeranने पहिल्यांदा मुंबईतल्या एका शाळेची भेट घेतली. तिथे विद्यार्थ्यांसमोर त्याने लाइव्ह परफॉर्मन्सदेखील केला. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
-
विद्यार्थ्यांनीही Ed Sheeranचं खुप चांगलं स्वागत केलं. Ed Sheeranसाठी स्टेजवर लहान मुलांनी गाणी गायली. या सगळ्याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आणि तो तुफान व्हायरल झाला. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
-
यानंतर अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचीही Ed Sheeranने भेट घेतली. आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एकत्रित पोलेरॉइड फोटो शेअर केला. (Photo Credit- armaanmalik/Instagram)
-
नंतर एका पार्टीत तो प्रसिद्ध गायक अरमान मलिकलासुद्धा भेटला आणि त्याच्याबरोबर ‘बुट्टा बोम्मा’ गाण्यावर डान्स केला. जो अजूनही व्हायरल होतोय. (Photo Credit- armaanmalik/Instagram)
-
अशातच Ed Sheeranचा नवीन व्हिडीओ समोर आला ज्यात तो बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबर त्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसला. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
-
शाहरुखची पत्नी गौरी खाननेसुद्धा Ed Sheeranबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने मन्नतला भेट दिल्याचीही चर्चा आहे. (Photo Credit- gaurikhan/Instagram)
-
चित्रपट निर्माती आणि लेखिका फराह खाननेसुद्धा Ed Sheeranसोबतचा फोटो शेअर केला आहे. (Photo Credit- farahkhankunder/Instagram)
-
Ed Sheeran भारतात आणि स्पेशली मुंबईत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचं कॉन्सर्ट. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”