-
Star Pravah Parivar Puraskar 2024: नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळा थाटात पार पडला.
-
यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे.
-
या सोहळ्यात ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेतील ‘गुंजा-कबीर’चा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.
-
या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग ‘गुंजा’ची भूमिका साकारत आहे.
-
अभिनेता हर्षद अतकरी या मालिकेत ‘कबीर’ची भूमिका साकारत आहे.
-
पुरस्कार सोहळ्यासाठी शर्वरी आणि हर्षदने ट्विनिंग केले होते.
-
शर्वरीने हटके पद्धतीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
-
हर्षदने गुलाबी रंगाचे ब्लेझर सूट आणि धोती परिधान केली आहे.
-
शर्वरी आणि हर्षदच्या या रोमँटिक अंदाजातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
या मालिकेत डोंगरपाड्यासारख्या छोट्याश्या गावात वाढलेल्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या ‘गुंजा’ची प्रेरणादायी गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी जोग/इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच