-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
अलीकडे तो ‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘ओले आले’ यांसारख्या चित्रपटात झळकला होता. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
गेल्यावर्षी सिद्धार्थने एक मोठा निर्णय घेतला ते म्हणजे आईचं दुसरं लग्न करून देण्याचा. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
सिद्धार्थची आई सीमा चांदेकर या देखील अभिनेत्री आहेत, हे सर्वश्रुत आहे. गेल्यावर्षी सीमा चांदेकर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
सीमा चांदेकरांना हे दुसरं लग्न अजिबात शक्य वाटतं नव्हतं. पण सिद्धार्थने त्यांची समजूत काढली आणि अखेर त्या दुसऱ्या लग्नासाठी तयार झाल्या. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
पण त्यापूर्वी सिद्धार्थला बायको मिताली मयेकरने एक मोलाचा सल्ला दिला होता. याविषयी अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीमधून सांगितले. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा तो म्हणाला, “सुरुवातीला मितालीला ही आयडिया कळलीच नव्हती. म्हणजे हे कसं होणार आहे? हे होऊ शकत का? आणि हे झालं तर मग हे काय होणार आहे? हेच तिला कळतं नव्हतं. मिताली भयंकर प्रॅक्टिकल आहे. मी भावनेच्या भरात खूप काही गोष्टी करतो. पण मिताली मला मागे खेचून सगळं काही नीट समजवते.” (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
“मितालीचं म्हणणं होतं की, त्या बाईनं आतापर्यंत जेवढं सोसलं आहे आणि तू जे आता लग्न करायचं म्हणतोय. पण याच्यातही काही समस्या निर्माण झाल्या तर तिला दुप्पट त्रास होईल. मग त्याचं काय करशील तू? मी म्हटलं आहे, हे सत्य आहे. याचा विचार मी नाही केला. पण आपण हा विचार केला की, समस्या आल्याच नाही तर काय होईल? शेवटी हात पोळलेले आहेत तर आता जास्त मेहनतीने काळजी घेऊन नातं सांभाळलं जाईल ना. माझ्या आईकडूनही आणि काकांकडूनही,” असं सिद्धार्थ म्हणाला. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)
-
या सगळ्या विचारांनंतर मिताली व सिद्धार्थच्या ताईकडून हळूहळू सीमा चांदेकरांच्या दुसऱ्या लग्नासाठी अभिनेत्याला पाठिंबा येऊ लागला. (फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)

Udayanraje Bhosale on Waghya Statue: “एवढ्या लांब कानाचा कुत्रा…”, वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर उदयनराजेंचा संताप; म्हणाले, “द्या दणका…”