-
गुलाल या सिनेमाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनुराग कश्यपचा हा सिनेमा आहे. यात पियूष मिश्राची महत्त्वाची भूमिका आहे. (सर्व फोटो-सौजन्य-पियूष मिश्रा, इंस्टाग्राम पेज)
-
गुलाल या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. राजस्थानमधलं रक्तरंजित राजकारण आणि त्याच्या भवताली घडणाऱ्या घडामोडी या सिनेमात चित्रीत करण्यात आल्या आहेत. .या सिनेमात माही गिलही महत्त्वाच्या भूमिकेत झळकली.
-
या सिनेमात के. के. मेनन मुख्य भूमिकेत होता. डुकी बनाह ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे.
-
पियूष मिश्रांनी साकारलेला पृथ्वीही लजवाब त्याची गाणी, त्याचा वावर सगळं आपल्याला अस्वस्थ करतं. ओ.. री दुनिया हे गाणं तर मनाला छेद देणारं.. आणि तितकंच सुन्न करणारं.. तर आरंभ हे प्रचंड हे आक्रमक गाणं आजही निवडणुकांच्या प्रचारासाठी वापरलं जातं.
-
दीपक डोब्रियाल, के. के. मेनन , आदित्य श्रीवास्तव आणि अभिमन्यू सिंग यांच्या सगळ्यांच्याच भूमिका खास होत्या यात काही शंकाच नाही.
-
गुलाल सिनेमा राजस्थानच्या महाविद्यालयीन राजकारणावर आणि शह-काटशहांवर बेतलेला आहे. अनुराग कश्यपने या सिनेमाला दिलेली ट्रिटमेंट हा चर्चेचा विषय ठरला होता.
-
महाविद्यालयात शिक्षणासाठी येणारा एक मुलगा दिलीप सिंग जी भूमिका राजसिंग चौधरी या अभिनेत्याने साकारली होती. त्याच्या भोवती कथा फिरते. कथा हीच सिनेमाची मुख्य नायिका आहे.
-
आदित्य श्रीवास्तव म्हणजेच करण जे राजकारण करतो त्यात तो डुकी बनाहला कसा शह देतो? त्यासाठी त्याला काय पणाला लावावं लागतं हे सगळं पाहणं रंजक झालं आहे.
-
या सिनेमाने खूप काही दिलं आहे या आशयाचं कॅप्शन पियूष मिश्राने या फोटोंना दिलं आहे… सिनेमा पाहिला तर लक्षात येतंच की सिनेमा खरोखच प्रत्येकाला समृद्ध करणारा होता.
-
सिनेमात राजकारण, मारामारी , रक्तपात, शिवीगाळ सगळं काही मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही सिनेमा मनाला भिडतो कारण तो मातीतला आहे. राजस्थानच्या मातीशी तो नातं सांगतो.

Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न