-
‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत हिच २८ फेब्रुवारीला लग्न झालं.
-
सिद्धेश चव्हाण याच्याशी पूजाने लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला.
-
साखरपुडा, व्याही जेवण, संगीत, मेहंदी, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजा सावंतचा पाहायला मिळाला.
-
लग्न झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा व देवदर्शन हे सर्वकाही पार पडल्यानंतर पूजा व सिद्धेश हनिमूनला जाताना पाहायला मिळाले. यासंबंधित फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
-
अजूनही पूजा व सिद्धेश हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत.
-
काल (१७ मार्च) पूजाने बीचवरील नवऱ्याबरोबर आनंद लुटतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
-
या फोटोमधील पूजाच्या बिकिनी लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
काही जणांना पूजाचा हा बिकिनी लूक आवडला असून काही जण त्यावर टीका करताना दिसत आहेत.
-
कलरफुल प्रिंटेड बिकिनी आणि त्यावर लीननचा पांढरा शर्ट अशा लूकमध्ये पूजा दिसत आहे.
-
या फोटोमध्ये पूजा समुद्रांच्या लाटांचा आनंदा लुटताना पाहायला मिळत आहे.
-
पूजाचा नवरा सिद्धेशने तिला मॅच करण्यासाठी पांढरे कपडे घातले होते; ज्यावर गॉगल लावला होता.
-
सर्व फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”