-
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे अभिनेत्री रुचा हसबनीसला खूप लोकप्रियता मिळाली.
-
या मालिकेत तिने राशी मोदीची भूमिका साकारली होती.
-
तब्बल चार वर्षे रुचाने राशी हे पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
-
मालिका बंद होऊन बरीच वर्षे लोटली असली तरी राशी म्हणजेच रुचा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
या मालिकेचे फोटो व व्हिडीओ चाहते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेनंतर रुचा परत कोणत्याही मालिकेत दिसली नाही.
-
रुचा हसबनीसचा जन्म ८ फेब्रुवारी १९८८ रोजी झाला. ती मराठी आहे. अभिनेत्रीने सीएचे शिक्षण घेतले आहे.
-
रुचा हसबनीसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०१५ मध्ये बिल्डर राहुल जगदाळेशी लग्न केलं.
-
लग्नानंतर रुचाने अभिनयातून ब्रेक घेतला.
-
राहुल व रुचाला दोन अपत्ये आहेत.
-
रुचाने २०१९ मध्ये एका मुलीला जन्म झाला आणि त्यानंतर २०२२ मध्ये तिला मुलगा झाला.
-
रुचाने तिच्या करिअरची सुरुवात ‘चार चौघी’ या मराठी नाटकातून केली होती.
-
पण राशी बेनच्या भूमिकेने रुचाला घराघरात ओळख मिळाली.
-
या मालिकेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी रुचा लग्नानंतर या क्षेत्रापासून दूर झाली.
-
अभिनयक्षेत्रात सक्रिय नसली तरी रुचा सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे.
-
ती सोशल मीडियावर पती व मुलांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
सोशल मीडियावर रुचाचे लाखो फॉलोअर्स आहेत.
-
२०२२ मध्ये ‘भाभी के प्यारे प्रीतम हमारे’ या शोमध्ये रुचा पाहुणी म्हणून विशाल सिंहबरोबर दिसली होती.
-
पण अभिनेत्री म्हणून तिने अद्याप पुनरागमन केलेलं नाही. ती तिच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतानाचे फोटो शेअर करत असते.
-
अभिनयापासून दूर असलेली रुचा कौटुंबीक व्यवसायात मदत करत असल्याचंही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय.
-
(सर्व फोटो – रुचा हसबनीस इन्स्टाग्राम)

“बाळा, मला मारू नको…” पोटच्या पोरानं वृद्ध आईला खड्ड्यात फेकलं… काळीज पिळवटून टाकणारा VIDEO