-
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला.
-
गेल्या काही वर्षांपासून सगळ्या मराठी वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
-
स्टार प्रवाहवर सुरू असणारी ‘ठरलं तर मग’ मालिका छोट्या पडद्यावर गेली दीड वर्षे अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.
-
त्यामुळे साहजिकच यंदाच्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’मध्ये या मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला.
-
जुई गडकरी व अमित भानुशाली यांच्या मुख्य भूमिका असणारी ‘ठरलं तर मग’ मालिका यंदा ‘स्टार प्रवाह’ची महामालिका ठरली आहे.
-
याशिवाय ‘ठरलं तर मग’च्या सुभेदार कुटुंबीयांना यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट परिवार’ हा पुरस्कार मिळाला आहे.
-
अर्जुन-सायलीने यंदाची ‘सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी’ या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
-
दरम्यान, सध्या या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह इन्स्टाग्राम )
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच