-
शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडमधील अतिशय फिट आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
तिच्या हटके फॅशनसेन्सने ती चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीही मागे राहत नाही.
-
नुकतंच शिल्पाने एका पुरस्कार सोहळ्यासाठी विचित्र पण तितकाच हटके पेहराव केला होता.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने काळ्या रंगाचा कटआउट गाऊन घातला होता.
-
या पेहरावात ती अतिशय सुंदर दिसत होती, तथापि तिच्या ड्रेसमध्ये असलेल्या प्लास्टिकच्या वापराने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले होते.
-
या कार्यक्रमातील फोटो शिल्पाने सोशल मीडियावर शेयर करताच चाहत्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
-
अगदी काही तासातच हे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी या फोटोवर अतिशय भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर शिल्पाची तुलना थेट उर्फीशी केली आहे.
-
एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘हिप बोन्स बाहेर आल्यासारखे आहे… जोक अ पार्ट…ती स्टनिंग आहे.’
-
तर दुसऱ्याने लिहिले ‘प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लास्टिक वापरायला नाही म्हणणे आणि त्याचा पुनर्वापर करण्यासाठीची सर्वोत्तम जाहिरात…’
-
एका यूजरने ‘ड्रेस होल्डर को निकलना भूल गई मॅडम’ अशी कमेंटही केली आहे.
-
आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, “नवऱ्याचा मास्क चुकीच्या ठिकाणी लावलाय”
-
दरम्यान, शिल्पा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फिटनेसशी संबंधित अनेक व्हिडिओ शेयर करून तिच्या चाहत्यांना व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित करत असते.
-
शिल्पा शेट्टी तिच्या आगामी चित्रपट प्रकल्पाची तयारी करत आहे. कन्नड चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’मध्ये ती संजय दत्त आणि जिशु सेनगुप्ता यांच्यासोबत काम करणार आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”