-
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त लेक मालतीसह भारतात दाखल झाली होती.
-
भारतात आल्यावर प्रियांका व तिचा पती निक जोनसने अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं.
-
यावेळी अभिनेत्रीबरोबर तिची आई देखील उपस्थित होती.
-
जानेवारी महिन्यात अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. यावेळी प्रियांका चोप्रा गैरहजर होती.
-
त्यामुळे पुन्हा परदेशात जाण्याआधी अभिनेत्रीने अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे.
-
अयोध्येतील काही सुंदर फोटो प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री मंदिरात दर्शन घेण्यासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिने लेकीला “अयोध्या म्हण…” ( say ayodhya ) असं सांगितलं. तिच्या लेकीने सुद्धा गोड बोबड्या आवाजात अयोध्या म्हटल्याचं प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
-
निक जोनस देखील पारंपरिक पोशाखात अयोध्येत आला होता.
-
दरम्यान, अयोध्येला गेल्यावर प्रियांकाने भारतीय संस्कृती जपल्याने सध्या सोशल मीडियावर तिचं कौतुक करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम )
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई