-
प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर नेहमीच त्याच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असतो.
-
करणने नुकतीच पिंकविलाच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी करणने ऑल ब्लॅक लूक क्रिएट केला होता.
-
यात करणने काळ्या रंगाचं डिझायनर ब्लेझर, मॅचिंग शर्ट पॅन्ट आणि बो घालून लूक पूर्ण केला होता.
-
करणच्या विलक्षण चष्म्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
या चष्म्याची खासियत अशी की यावर वाघाची डिझाईन होती.
-
या सोहळ्यात करणला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
-
करणला मिळालेल्या पुरस्काराबद्दल चाहत्यांनी त्याचे कमेंट्स करत अभिनंदन आणि कौतुक केले.
-
दरम्यान, करण जोहरचा सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘योद्धा’ आणि सारा अली खान अभिनीत ‘ऐ वतन मेरे वतन’ हे दोन्ही चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. (All Photos- karanjohar/Instagram)
Daily horoscope: धनिष्ठा नक्षत्रात कोणत्या राशीचे चमकणार नशीब? कोणाला नोकरीत प्रमोशन तर कोणाला प्रचंड धनलाभाची संधी