-
सुप्रसिद्ध पंजाबी दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या घरी आनंदाचे वातावरण पसरलं आहे. कारण एका चिमुकल्याचं आगमन मुसेवालाच्या घरी झालं आहे. (फोटो सौजन्य – बलकौर सिंह इन्स्टाग्राम)
-
१७ मार्चला सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी ५८व्या वर्षी एका गोंडस बाळाला जन्म दिल्या. आयव्हीएफच्या मदतीने त्या गर्भवती राहिल्या होत्या. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धूच्या भावाची पहिली झलक वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. (फोटो सौजन्य – बलकौर सिंह इन्स्टाग्राम)
-
“शुभदीपच्या (सिद्धू मुसेवाला) लाखो-कोट्यवधी चाहत्यांच्या आशीर्वादाने ईश्वराने आम्हाला सिद्धूचा छोटा भाऊ दिला आहे. ईश्वराच्या कृपेनं कुटुंब निरोगी आहे आणि मी आमच्या शुभचिंतकांचे आभार मानतो. वाहेगुरूने आम्हाला दिलेल्या या आशीर्वादाबाबत ऋण व्यक्त करतो,” असं लिहित बलकौर सिंह यांनी आपल्या दुसऱ्या लेकाचा फोटो शेअर केला होता. (फोटो सौजन्य – बलकौर सिंह इन्स्टाग्राम)
-
आता बलकौर सिंह यांनी दुसऱ्या लेकाचं नाव जाहीर केलं आहे. त्यामुळे आज आपण सिद्धू मुसेवालाच्या दुसऱ्या भावाचं नाव काय आहे? त्या नावाचा अर्थ काय आहे? जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य – बलकौर सिंह इन्स्टाग्राम)
-
सिद्धूच्या भावाचं नावं शुभदीप असं ठेवलं आहे; जे सिद्धूचं मूळ नाव आहे. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
शुभदीप हे मुलांसाठी खूप विशेष नाव आहे. या नावाचा अर्थ असा होता की, एक शुभ दिवा, जो घराचं नाव उज्ज्वल करतो. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, दुसऱ्याबाजूला शुभदीपचा जन्म होताच दोन दिवसांनी पंजाब सरकारकडून मुलाच्या उपचाराबाबतचा सविस्तर तपशील मागितला. यासंदर्भात बलकौर सिंह यांनी व्हिडीओ शेअर केला होता. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
बलकौर सिंह व्हिडीओतून म्हणाले होते की, मी तुम्हाला आश्वासन देतो की, मी कोणत्याही कायदेशीर चौकशीत पूर्ण सहभाग घेईन आणि सहकार्य करेन. मी कुठलाही कायदा मोडला असेल तर मला अटक करा. पण तरीही तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर माझ्याविरोधात एफआयआर दाखल करा, मला अटक करा आणि तुमची चौकशी करा. मी वचन देतो की, तुम्हाला सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवेन आणि यातून निर्दोष होऊन बाहेर पडेन. एका (फोटो सौजन्य – बलकौर सिंह इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO