-
दीपिका पदुकोण एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण आता तिने भारतीय टचसह तिचं पहिलं-वहिलं होम फर्निशिंग कलेक्शन लॉन्च केलं आहे.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोणने अमेरिकन लेबल,’पॉटरी बार्न’ या ब्रॅंडच्या सहकार्याने हे फर्निशिंग कलेक्शन लॉन्च केलंय.
-
भरतकाम केलेल्या उशा, गालिचा, झुंबर, कुशन डेकोर, मोहक लाकडी फर्निचर आणि भारतीय खाद्यपदार्थांसाठी बनवलेले डिनरवेअर अशा वस्तू या ब्रँडसह अभिनेत्रीने लॉन्च केल्या आहेत.
-
कमीत कमी ३००० रुपयांपासून या वस्तूंची सुरूवात होते. यात मेणबत्तीचा सेट येतो.
-
पर्शियन-शैलीच्या हाताने बनलेल्या गालिच्याची ३,९५,००० रुपये किंमत आहे.
-
पॉटरी बार्नच्या, दीपिकाच्या कलेक्शनमध्ये २,५०,००० रुपये किमतीचा ८ ड्रॉवरचा ड्रेसर तर २,३०,००० रुपये किमतीचा किंग-साईज कॅन बेड आहे.
-
१,७०,००० रुपये किमतीचा मेटल गोल झुंबर आणि लोखंडी रॉडचे झुंबर १,००,००० रुपये किमतीचे आहे.
-
बेडिंग, बाथ आणि डायनिंगच्या विस्तृत श्रेणीपासून ते आरसे, लाइट्सपर्यंत, दीपिकाच्या ‘पॉटरी बार्न’ कलेक्शनमध्ये घरातल्या अगदी सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.
-
दरम्यान या ब्रॅंडबरोबर कोलॅब करतानाचा अनुभव सांगताना दीपिका म्हणाली, “पॉटरी बार्न’ यांच मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि मी भारतात राहते. त्यामुळे या कामासाठी मला खूप वेळा तिथे जावं लागलं. या सगळ्या कलेक्शनसाठी आम्हाला दोन वर्षे लागली.” (All photos-potterybarn)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश