-
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात वंदना गुप्तेंनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते यांना ओळखलं जातं.
-
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटात वंदना गुप्ते व बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने एकत्र काम केलं होतं.
-
‘बकेट लिस्ट’ चित्रपटात एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
-
चित्रपटाच्या रिडिंगच्यावेळी माधुरी अगदी साधी आणि छान तयार होऊन आल्याचं वंदना गुप्तेंनी सांगितलं.
-
माधुरीबरोबर भेट झाल्यावर वंदना गुप्ते तिला म्हणाल्या, “मला तुझ्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती पण, माझी एक अट आहे.”
-
ही अट म्हणजे…तू माझ्याबरोबर रोज एक सेल्फी काढायचा. त्यानंतर मी विसरले तरी माधुरी आठवणीने सेल्फी काढायची. आमचे बरेच सेल्फी मी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.” असं वंदना गुप्तेंनी सांगितलं.
-
वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, “संसार सांभाळून, मराठी संस्कृती- परंपरा जपून आणि त्यात दोन मुलांचा सांभाळ हे सगळं तिने उत्तमप्रकारे केलं. खरंच ती घरंदाज आहे. जगभरात नाव कमावून देखील ती अत्यंत साधी आहे.”
-
दरम्यान, ‘बकेट लिस्ट’ चित्रपटात वंदना गुप्ते व माधुरीसह सुमीत राघवन, इला भाटे, प्रदीप वेलणकर, रेणुका शहाणे, कृतिका राव, मिलिंद पाठक, रेशम टिपणीस यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ( सर्व फोटो सौजन्य : वंदना गुप्ते इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”