-
‘पाव्हणं जेवला काय’, ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यांवर जबरदस्त डान्स करून चाहत्यांच मन जिंकणारी गौतमी पाटील आता घराघरांत लोकप्रिय आहे.
-
‘सबसे कातिल गौतमी पाटील’ या नावानं तिला ओळख प्राप्त झाली.
-
गौतमीने नुकतेच होळी साजरी करतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गौतमीने यात सफेद रंगाची ऑर्गेन्झा साडी परिधान केली आहे.
-
या साडीला कॉन्ट्रास्ट म्हणून सीक्वेन्सच्या काळ्या रंगाच्या ब्लाऊजची निवड गौतमीने केली आहे.
-
रंगपंचमी साजरी करत या फोटोजमध्ये गौतमी रंगाने माखलेली दिसतेय.
-
खुले केस, मोहक अदा आणि मिनिमल ज्वेलरीमध्ये गौतमीचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.
-
होळीच्या सणानिमित्त गौतमीने शेअर केलेल्या या फोटोजमुळे चाहते घायाळ झाले आहेत.
-
गौतमीच्या फोटोजवर कमेंट करत “कसला रंग लागलाय राव” असं एकाने लिहिलं. (All Photos- official_gautami941__/Instagram)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर