-
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. (फोटो सौजन्य – स्पृहा जोशी इन्स्टाग्राम)
-
स्पृहा उत्तम अभिनय कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनयाबरोबर तिनं कविता, लेखन, सूत्रसंचालन या माध्यमातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (फोटो सौजन्य – स्पृहा जोशी इन्स्टाग्राम)
-
नाटक असो, मालिका असो, चित्रपट असो किंवा वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये स्पृहाने स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (फोटो सौजन्य – स्पृहा जोशी इन्स्टाग्राम)
-
अशी ही बहुगुणी, बहुआयामी स्पृहा जोशी लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य – स्पृहा जोशी इन्स्टाग्राम)
-
‘कलर्स मराठी’वरील ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत स्पृहा झळकणार आहे. या मालिकेत स्पृहासह अभिनेता सागर देशपांडे पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – कलर्स मराठी)
-
नुकताच स्पृहाचा ‘सुख कळले’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला; याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य – कलर्स मराठी)
-
२२ एप्रिलपासून स्पृहाची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे स्पृहाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – कलर्स मराठी)
-
‘सुख कळले’च्या नव्या प्रोमोमधील स्पृहाच्या मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोत अभिनेत्रीचं हटके मंगळसूत्र पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – कलर्स मराठी)
-
नव्या मालिकेतील स्पृहाच्या मंगळसूत्रातील पेडंटमध्ये लक्ष्मीची पावलं दिसत आहेत. (फोटो सौजन्य – कलर्स मराठी)
-
अशाच प्रकारे मालिकेच्या टायटलमध्ये देखील कळले यातील ‘ळ’ अक्षरावर लक्ष्मीची पावलं पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – कलर्स मराठी)
-
दरम्यान, स्पृहा याआधी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य – स्पृहा जोशी इन्स्टाग्राम)
-
पण स्पृहाची ही मालिका टीआरपीच्या कारणास्तव काही महिन्यांतच ऑफ एअर झाली. (फोटो सौजन्य – स्पृहा जोशी इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”