-
काल म्हणजेच २५ मार्चला संपूर्ण भारतात होळीची धामधूम पाहायला मिळाली. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच होळीचा मनमुराद आनंद लुटला. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार प्रियांका चोप्रानेही आपल्या कुटुंबियांसह होळी हा सण साजरा केला. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
गेल्या आठवड्यात प्रियांका, निक आणि मालतीबरोबर अयोध्येला गेली होती. तिथले फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. (Photo: Priyanka/Instagram)
-
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रियांकाला हजर राहता आले नसल्याने तिने सहकुटुंब राम मंदिराला भेट दिली आणि रामलल्लाचे दर्शन घेतले. (Photo: Priyanka/Instagram)
-
यानंतर त्यांनी संपूर्ण चोप्रा कुटुंबियांसाठी लहानशा फॅमिली पार्टीचे आयोजन केले होते. (Photo: Priyanka/Instagram)
-
या पार्टीमध्ये संपूर्ण चोप्रा कुटुंब एकत्र होळी खेळताना दिसले. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
यासंबंधीचे अनेक फोटो प्रियांकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेयर केले आहेत. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
प्रियांका आणि निक जोनासची लाडकी लेक मालतीची भारतातली ही पहिलीच धुळवड होती. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
यावेळी मालतीने सफेद रंगाचा ड्रेस आणि टोपी घातली आहे आणि प्रियांकाने आपल्या लेकीला कमरेवर उचलून घेतल आहे. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
यात मालती यात खूप गोड दिसतेय, तर प्रियांकाने सफेद रंगाचा चुडीदार ड्रेस घातला आहे. (Photo: Priyanka/Instagram)
-
संपूर्ण कुटुंबाने होळीसाठी खास सफेद रंगाचे कपडे परिधान केले होते. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
होळीतील प्रियांका, निक आणि मालतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Photo: Priyanka/Instagram)
-
यातल्या एका फोटोमध्ये प्रियांका तिच्या कुटुंबाबरोबर होळी खेळताना दिसतेय. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
एका व्हायरल व्हिडीओत प्रियांका ढोलाच्या तालावर नाचताना दिसली. निकनेही यात आनंदाने सहभाग घेतला होता. (Photo: Priyanka/Instagram)
-
गुलाबी रंगाने निक आणि प्रियांका माखलेले दिसत होते. (Photo: Priyanka/Instagram)
-
बिग बॉस फेम मन्नारा चोप्राही या पार्टीला हजर होती. मन्नाराने सफेद रंगाचं टी-शर्ट आणि डेनिम स्कर्ट परिधान केला होता. (Photo: Patty Cardona/Instagram)
-
चोप्रा कुटुंबाच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो प्रियांकाच्या एका फॅन पेजवरून व्हायरल झाले. (Photo: Priyanka/Instagram)
-
“चोप्रा कुटुंबातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा”, असं कॅप्शन या पोस्टला दिलं गेलं होतं. (Photo: Patty Cardona/Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”