-
Muramba TV Serial: स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी ठरत आहे.
-
अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरत आहे.
-
वेगवेगळी कारस्थानं करुन रमा आणि अक्षयला वेगळं करु पहाणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे.
-
या मालिकेत लवकरच रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे.
-
अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे.
-
‘मुरांबा’ या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना आशय म्हणाला, स्टार प्रवाह वाहिनीबरोबर काम करण्याची इच्छा होती. या मालिकेच्या निमित्ताने ती पूर्ण होते आहे.
-
जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा मालिकेत काम करतोय.
-
‘मुरांबा’ मालिकेत मी खलनायक साकारणार आहे.
-
खलनायक साकारताना पात्र एका साच्यात अडकत नाही.
-
त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची मुभा असते.
-
हळूहळू मला हे पात्र गवसतं आहे. शशांक केतकरबरोबर मी याआधी काम केलं आहे त्यामुळे आमची मैत्री होतीच.
-
इतर कलाकारांबरोबरही छान गट्टी जमली आहे.
-
‘मुरांबा’ मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यामुळे नवं कुटुंब मिळालं आहे असं म्हणता येईल.
-
अथर्वच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : आशय कुलकर्णी आणि स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
![sharad ponkshe review chhaava vicky kaushal laxman utekar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/sharad-ponkshe-review-chhaava-vicky-kaushal-laxman-utekar.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”