-
अभिनेत्री तापसी पन्नूने तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बोशी राजस्थानमध्ये लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.
-
तापसीने व मॅथियस यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं, असं म्हटलं जातंय.
-
तापसीने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. तर तापसीचा जोडीदार काय करतो, ते जाणून घेऊयात.
-
मॅथियस बो ४३ वर्षांचा आहे. तो माजी बॅडमिंटनपटू आहे.
-
तो डेन्मार्कचा रहिवासी असून त्याने २०१२ मधील ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत रौप्य पदक जिंकले होते.
-
त्यावेळी, तापसी पन्नू हैदराबाद हॉटशॉट्सची ब्रँड ॲम्बेसेडर होती. दोघेही लखनौमध्येच पहिल्यांदा भेटले होते.
-
तापसी व मॅथियस यांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे.
-
डेन्मार्ककडून खेळताना मॅथियासने २०१५ मध्ये युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०१६ मध्ये चीनच्या कुनशान इथं झालेल्या थॉमस कपमध्येही त्याने डॅनिश टीमला विजय मिळवून दिला होता.
-
डेन्मार्ककडून खेळताना मॅथियासने अनेक पदकं जिंकली. अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तो २०२० मध्ये निवृत्त झाला.
-
यानंतर भारतीय खेळाडूंच्या विनंतीवरून मॅथियासला भारतीय दुहेरी टीमचा कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं.
-
(सर्व फोटो – तापसी व मॅथियास इन्स्टाग्राम)
