-
गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
२०१९ पासून सुरू झालेल्या या मालिकेवर अजूनही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
नुकताच मालिकेत अरुंधतीचा नवा प्रवास सुरू आहे. १८ मार्चपासून ‘आई कुठे काय करते’ ही मालिका दुपारी २.३० वाजता प्रसारित होतं आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
आशुतोषचं निधन आणि त्यानंतरचा अरुंधतीचा प्रवास या मोठ्या ट्विस्टमुळे नेटकऱ्यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला खूप ट्रोल केलं होतं. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
पण तुम्हाला हे माहितीये का? अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या घरी ‘आई कुठे काय करते’ मालिका पाहिली जात नाही. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
अलीकडेच ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना मधुराणी प्रभुलकरने हा खुलासा केला. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
मधुराणीला विचारलं गेलं होतं की, ‘आई कुठे काय करते मालिके’विषयी घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “माझ्या घरी माझी मालिका पाहत नाही.” (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
“कारण माझी मुलगी लहान आहे. त्यामुळे आमच्या घरात टीव्ही तेवढा लावला जात नाही. माझी मुलगी तिच्या वयानुसार कंटेंट बघते. त्याच्यामुळे आमच्या घरात प्रत्यक्षात मालिका पाहत नाही,” असं मधुराणीने स्पष्ट म्हणाली. तसंच तिने पुढे तिची आई ही मालिका पाहून काय म्हणते हे देखील सांगितलं. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
मधुराणी म्हणाली, “माझी आई मालिका मधेमधे बघत असते. तिचं काहींना काहीतरी प्रत्येक गोष्टीवर म्हण असतं.” (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
“आता काय हे नवीन? असं का दाखवताय? तुला किती संकटातून पाठवणार आहेत? कशाला एवढं? तू किती रडणार आहेस? असं तिला होतं असतं. पण तिला मी समजून सांगते,” असं मधुराणी म्हणाली. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका आधी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होतं होती. पण आता या मालिकेची जागा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेने घेतली आहे. १८ मार्चपासून ही नवी मालिका ७.३० वाजता प्रसारित होतं आहे. (फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…