-
बॉलिवूडची अभिनेत्री कंगणा रणौतला भाजपाने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
-
‘भारताला २०१४ साली स्वातंत्र्य मिळाले’, असे विधान काही काळापूर्वी कंगणा रणौतनं केलं होतं. त्या विधानावरून तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा कंगणाने याच विधानावर भाष्य केलं आहे.
-
टाइम्स नाऊ समिट २०२४ मध्ये बोलताना कंगणा रणौत म्हणाली, “होय, २०१४ रोजीच भारताला स्वातंत्र्य मिळालं.” या विधानावरून जे लोक ट्रोल करतात, त्यांनी समोर येऊन चर्चा करावी, असंही आवाहन कंगनानं केलं.
-
टाइम्स नाऊ समिटमध्ये बोलताना कंगना रणौत म्हणाली, “शरीराने स्वतंत्र होण्यालाच आपण स्वातंत्र्य मानतो का? तसे मानले तर आपण पारतंत्र्यात कधीच नव्हतो. कारण इंग्रजांनी आपल्याला तुरुंगात डांबलं नव्हतं. ते तर भारताला आपली वसाहत असल्याचे सांगत होते.
-
“आपल्या देशात त्यांचे कायदे होते. तर आपण विचाराने पारतंत्र्यात होतो. आपल्याला स्वतःचे लोक निवडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. १९४७ नंतर देशात विदेशी मानसिकतेच्या लोकाचं शासन होतं. आपली धोरणे विदेशातून ठरत होती. आपल्याला धर्माचे आचरण करता येत नव्हते. हिंदू असणे ही शरमेची बाब वाटत होती”, असंही कंगना म्हणाली.
-
जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे होते? त्यांना कुणी गायब केलं? ज्या व्यक्तीने स्वतःचे रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याचं विमान भारतात उतरू दिलं नाही. उलट जे लोक तुरुंगात बसून टीव्ही पाहत होते, ते नंतर या देशाचे सरकार चालवू लागले.
-
स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हातात सत्ता गेली, ते ब्रिटिशांचेच पुढचे वारसदार होते, हे मी पुराव्यासह सिद्ध करू शकते, असेही आव्हान कंगना रणौतने दिलं.
-
१९४७ नंतर आपल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना बेपत्ता केलं गेलं. आझाद हिंद सेनेचे लोक उपाशी मारले. त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले गेले. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरून दिसतं की, आपल्याला स्वातंत्र्य २०१४ रोजी मिळालं.
-
तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्रजी येत नव्हतं म्हणून पंतप्रधान केलं गेलं नाही, असाही दावा कंगना रणौतने यावेळी केला.
-
२०१४ नंतर आपल्याला हिंदू म्हणून अभिमानानं जगता येत आहे, आपल्या विचारधारेला सन्मान मिळत आहे, असंही कंगना या मुलाखतीमध्ये म्हणाली.
-
कंगना रणौतला हिमाचलच्या मंडी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी केलेलं एक विधान वादग्रस्त ठरलं. ज्यामुळं कंगना रणौतच्या मंडी मतदारसंघाची संपूर्ण भारताला ओळख झाली.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा