-
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशीच्या वडिलांचा काल (२८ मार्च) वाढदिवस होता.
-
वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने त्यांना गाडी गिफ्ट केली आहे.
-
हार्दिकने गिफ्ट केलेली गाडी ही महिंद्राची XUV700 आहे.
-
महिंद्रा XUV 700 ची किंमत १४.०१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २६.१८ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते.
-
हार्दिकने शेअर केलेल्या या फोटोंवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
हार्दिक सध्या स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे.
-
हार्दिकने झी मराठीच्या ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका निभावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : हार्दिक जोशी/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”