-
अभिनेत्री प्रिया बापट आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे.
-
ती रस्त्याने चालत असताना एका पुरुषाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं.
-
‘हॉटरफ्लाय’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने हा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
-
२०१० मध्ये दादरमध्ये माझ्या घरासमोरच्या गल्लीत ही घटना घडली होती, असं प्रियाने सांगितलं.
-
मी शूट संपवून घरी परत येत होते. माझ्या हातात पिशव्या होत्या आणि मी फोनवर बोलत चालत होते. कानाला फोन होता, हातात पिशव्या घेऊन मी जात होते. – प्रिया बापट
-
एक माणूस समोरून आला, त्याने माझे स्तन पकडले आणि तो पळून गेला. काय घडलंय हे समजायला मला तीन सेकंद लागले. – प्रिया बापट
-
मी तिथे स्तब्ध उभी होते, मला कळतच नव्हतं की काय घडलंय. – प्रिया बापट
-
मी मागे वळून पाहिलं तर तो तिथे नव्हता, तो पळून गेला होता. काही क्षणात तो तिथून गायब झाला होता. – प्रिया बापट
-
मी घरी गेले, दुर्दैवाने आई घरी नव्हती, बाबा होते. मला कळत नव्हतं की जे घडलंय ते बाबांना कसं सांगावं.- प्रिया बापट
-
मी सारखी रडत होते, माझ्या बाबांनी विचारलं की काय झालंय? मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला.- प्रिया बापट
-
“मी माझ्या बाबांकडे बघितलं तर त्या क्षणी ते खूप असहाय्य वाटत होते. जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि काय करावं हे त्यांना कळत नव्हतं” असं प्रिया म्हणाली.
-
‘अशा गोष्टी होत असतात,’ असं काहीच ते बोलले नाहीत. तसंच हे तुझ्याबरोबर घडायला नको होतं, मी त्याला मारेन, असंही ते म्हणाले नाहीत. कारण मारणार तरी कसे?’ असं प्रिया म्हणाली.
-
ज्या माणसाने हे केलं त्याचा उद्देश काय असेल, असा प्रश्न मुलाखतकाराने विचारल्यावर प्रिया म्हणाली, “मला वाटतं त्याला कदाचित आनंद घ्यायचा असेल. त्याला रस्त्यावर एक महिला दिसली, जिचे हात रिकामे नव्हते, त्यामुळे त्याला वाटलं की ही काहीच करू शकणार नाही.”
-
“मी असहाय्य होते आणि त्याने त्या परिस्थितीचा फायदा उचलला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं,” असं प्रिया म्हणाली.
-
“तेव्हापासून आजवर जर मला कुणाची नजरही वाईट असल्याचं जाणवलं की मला वाटतं ती व्यक्ती येऊन मला स्पर्श करेल, त्याआधी मी जाऊन त्याला पकडावं आणि मारावं,” असं प्रिया म्हणाली.
-
“तेव्हाचा राग माझ्या मनात अजूनही आहे,” असं प्रिया बापट म्हणाली.
-
(फोटो – प्रिया बापट इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”