-
‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका आहे. सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने आता लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे.
-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपआपले पात्र उत्तमरित्या निभावलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ती पात्र आपलीशी वाटतं आहेत.
-
मालिकेने आता ५०० भागांचा टप्पा गाठला असून हा खास क्षण जोरदार साजरा करण्यात आला. याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं आहेत.
-
अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे यशस्वीरित्या या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पार केला.
-
यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळींसह संपूर्ण टीमने जंगी सेलिब्रेशन केलं.
-
दोन मोठे केक कापून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या टीमने हा खास क्षण साजरा केला. यावेळी सगळ्या टीमला खास भेटवस्तू देण्यात आली.
-
याशिवाय तुषार देवलने मालिकेचं शीर्षक गीत गायलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.
-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा, अजिंक्य व्यतिरिक्त ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, मुग्धा गोडबोले-रानडे, रजनी वेलणकर, जान्हवी किल्लेकर, अमृता रावराणे, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…