-
गौतम जोगळेकर दिग्दर्शित ‘पक पक पकाक’ या चित्रपटाचं नाव घेतलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो भुत्या. (व्हिडीओ पॅलेसवरून स्क्रीनशॉट)
-
नाना पाटेकर यांनी साकारलेली भुत्याची भूमिका जितकी भीतीदायक होती तितकीच आपलीशी करू जाणारी होती.(व्हिडीओ पॅलेसवरून स्क्रीनशॉट)
-
‘पक पक पकाक’ या चित्रपटातील प्रत्येक भूमिका हिट ठरली. पण चिकलू व साळू ही जोडी लक्षवेधी ठरली.(व्हिडीओ पॅलेसवरून स्क्रीनशॉट)
-
डोक्यावर टोपी, लहान बाह्या असलेला शर्ट आणि छोटी पॅन्ट अशा रुपात झळकलेला चिकलू लोकांच्या कायम स्मरणात राहिला. शिवाय त्याबरोबर असलेली उंच, सावळ्या रंगाची, नऊवारी साडीतली साळूने तर प्रेक्षकांची मनं जिंकली. (व्हिडीओ पॅलेसवरून स्क्रीनशॉट)
-
“तुझं लगीन साळू की बुळूबुळू वाळू…”, हे चिकलू व साळूचं गाणं तर सुपरहिट झालं. अजूनही लोक आवडीने हे गाणं ऐकतात.(व्हिडीओ पॅलेसवरून स्क्रीनशॉट)
-
२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘पक पक पकाक’ या चित्रपटाला तब्बल १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. या १९ वर्षात या चित्रपटातील कलाकारांमध्ये बराच बदल झाला आहे.
-
आज आपण प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने व अभिनयाने भुरळ पाडणारी साळू म्हणजे अभिनेत्री नारायणी शास्त्री काय करते हे जाणून घेणार आहोत…
-
नारायणी शास्त्री ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
-
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत केसरची भूमिका साकारून लोकप्रियता मिळविणाऱ्या नारायणीला सिनेसृष्टीत जवळपास २५ वर्षे झाली आहेत.
-
तिने तिच्या करिअरमध्ये ‘पिया का घर’, ‘कोई अपना सा’, ‘आप की नजरों ने समझा’, ‘पिया रंगरेझ’ अशा मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
नारायणीने ‘चांदनी बार’, ‘मानसरोवर’, ‘मुंबई मेरी जान’, ‘ना घर के ना घाट के’, ‘ऋण’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
नारायणी तिच्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली.
-
नारायणी अभिनेता अनुज सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
-
ब्रेकअप झाल्यावर ती अभिनेता गौरव चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
-
दोघांनी नच बलिये २ मध्ये भागही घेतला होता.
-
पण त्यांचं ब्रेकअप झालं आणि मग २०१५ मध्ये तिने स्टीव्हन ग्रेव्हरशी लग्न केलं.
-
नारायणी शास्त्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती तिच्या मालिकेच्या सेटवरील फोटो व व्हिडीओ, रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
सध्या ती ‘लाल बनारसी’ मालिकेत काम करत आहे.
-
तिची ही मालिका खूप लोकप्रिय आहे.
-
(नारायणी शास्त्रीचे सर्व फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं