-
प्रिया बापट ही मराठीसह हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती सोशल मीडियावर काम व वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणांचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.
-
प्रियाने १३ वर्षांपूर्वी अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं आहे.
-
प्रिया व उमेश सध्या एकत्र ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात एकत्र काम करत आहेत.
-
नाटकानंतर बरेच लोक भेटायला येतात. अशाच भेटायला आलेल्या एका महिलेचा किस्सा प्रियाने सांगितला आहे.
-
लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत, तर बाळाबद्दल तुला विचारलं जात असेल, ते प्रश्न कसे हाताळतेस? असा प्रश्न ‘हॉटरफ्लाय’ च्या मुलाखतीत प्रियाला विचारण्यात आला.
-
या प्रश्नाचं प्रियाने उत्तर दिलं, तसेच एक किस्साही सांगितला.
-
तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? काही महिला आहेत, ज्यांना मुलं नकोयत आणि त्या आनंदी आहेत, तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे, असं वाटतं. – प्रिया बापट
-
माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स आढळतील. – प्रिया बापट
-
उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. – प्रिया बापट
-
“पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार,” असं प्रिया म्हणाली.
-
प्रियाने नाटकानंतरचा एक अनुभव सांगितला. “मी आणि उमेश एकत्र एक नाटक करतोय. नाटकानंतर लोक भेटायला येतात, एकेदिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या, ‘आता आम्हाला गुडन्यूज पाहिजे’.
-
मी म्हणाले ‘आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुडन्यूज मिळाली ना’. पण त्या म्हणाल्या ‘तू बाळ कधी करणार’.
-
“मी उत्तर देईस्तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या. मग मी त्यांना म्हणाले, काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका,” असं प्रिया म्हणाली.
-
एका फोटोवर अनुष्का शर्माचा उल्लेख करत प्रेग्नन्सीबद्दल कमेंट्स आल्या, असा खुलासा प्रियाने केला.
-
“नुकताच मी पोलका डॉट प्रिंटचा काळ्या रंगाच्या ड्रेसवरचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर ‘प्रिया बापट प्रेग्नंट आहे’, अशा कमेंट्स होत्या.”
-
“अनुष्का शर्माने तिच्या प्रेग्नन्सीवेळी पोलका डॉट ड्रेस घातला होता, त्यामुळे मी घातला तर त्यांच्यामते मी प्रेग्नंट आहे,” असं म्हणत प्रिया हसू लागली. (सर्व फोटो – प्रिया बापट इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”