-
टीव्ही कलाकार करण शर्मा व पूजा सिंह लग्नबंधनात अडकले आहेत.
-
करण व पूजा दोघांचंही दुसरं लग्न आहे.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. चाहते त्यांना सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.
-
४३ वर्षीय करणने लोकप्रिय अभिनेत्री पूजा सिंह हिच्याशी लग्न केलं.
-
पूजाने ‘दिया और बाती हम’ मालिकेत संध्याच्या जाऊची भूमिका केली होती.
-
तर, करण हा ‘ससुराल सिमर का’, ‘एक नई पेहचान’, ‘काला टीका’, ‘ससुराल सिमर का २’ या मालिकांसाठी ओळखला जातो.
-
पूजा व करण यांनी ३० मार्च रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
करण व पूजा यांच्या लग्नातील विधींचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
अभिनेता सिद्धार्थ निगमने या दोघांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.
-
करण व पूजाच्या लग्नाला अनेक टीव्ही कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.
-
करण व पूजा यांच्या लग्नातील विधींचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
करणचं पहिलं लग्न टिया कर हिच्याशी २०१६ मध्ये झालं आणि तीन वर्षांनी २०१९ मध्ये ते विभक्त झाले.
-
पूजाने २०१७ मध्ये कपिल छट्टानीशी लग्न केलं होतं. पण त्यांचं लग्नही फारकाळ टिकू शकलं नाही.
-
दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता तिने करणशी दुसरं लग्न केलं आहे.
-
(सर्व फोटो – पूजा सिंह, सिद्धार्थ निगम, श्रुती बडजात्या, राधिका मुथूकुमार यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

…अन् क्षणात गमावले तब्बल ६१ लाख! मराठी अभिनेत्याची फसवणूक; ‘ती’ गोष्ट पडली महागात, नेमकं प्रकरण काय?