-
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
३५ वर्षीय सिद्धार्थने नीलम उपाध्यायशी ‘रोका’ केला आहे.
-
नीलमने या सोहळ्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये नीलम व सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत आहेत.
-
सिद्धार्थ व नीलम यांच्या ‘रोका’ सेरेमनीसाठी प्रियांका भारतात आली होती.
-
प्रियांका पती निक जोनस व लेक मालतीबरोबर जवळजवळ दोन आठवडे भारतात होती.
-
ती लहान भावाच्या ‘रोका’ सेरेमनीसाठी आली होती.
-
या कार्यक्रमाला चोप्रा व उपाध्याय कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते.
-
सिद्धार्थ व नीलम यांच्या रोका सेरेमनीची खूप चर्चा आहे.
-
या पार्श्वभूमीवर आपण नीलम उपाध्यायबद्दल जाणून घेऊयात.
-
नीलम ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
-
तिने अनेक तेलुगू व तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
नीलम व सिद्धार्थ मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते.
-
नीलमने २०१२ मध्ये ‘मिस्टर 7’ या तेलुगू चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
यानंतर तिने तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं.
-
५ ऑक्टोबर १९९३ रोजी जन्मलेली नीलम ३० वर्षांची आहे.
-
सिद्धार्थची होणारी पत्नी नीलम हिचा जन्म मुंबईत झाला होता.
-
तिला मोठा भाऊ असून तो विवाहित आहे.
-
श्रीमती एमएमके कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून तिने शिक्षण घेतलं आहे.
-
तिने इंग्रजी साहित्यात बी.ए. केलं आहे.
-
तसेच फोटोग्राफीमध्ये तिने डिप्लोमा केला आहे.
-
अॅक्शन थ्रीडी, ओन्नाडू ओरू नाल, पंदगला वाचाडू, मेरा कर्तव्य माय ड्यूटी अशा सिनेमात तिने काम केलं.
-
सुकुमारूडू, चोरों का चोर, तमाशा, लव्हर हे तिचे इतर काही लोकप्रिय चित्रपट आहेत.
-
नीलम सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
-
ती इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
इन्स्टाग्रामव तिचे २३ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
प्रियांका चोप्राही तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करते.
-
नीलम सिद्धार्थबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो – नीलम उपाध्याय इन्स्टाग्राम)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”