-
‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेत अपर्णाची भूमिका साकारल्याने ऐश्वर्या नागेशला ओळख मिळाली.
-
ऐश्वर्याने आता अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेत न्यूज अँकरिंगचं क्षेत्र निवडलं आहे.
-
अभिनेत्री झाल्यानंतर न्यूज अँकरिंगमध्ये इंटरेस्ट दाखवणारी अभिनेत्री ऐश्वर्या नागेश आता थेट आयपीएलसाठी सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
-
ऐश्वर्याला प्रथमच टाटा आयपीएलच्या १७ व्या सीजनमध्ये अँकरिंग करण्याची संधी मिळाली आहे.
-
याबद्दलची पोस्ट तिनं तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
या शोमध्ये अतुल बेदाडे आणि सिद्धेश लाड गेस्ट होते.
-
कॉलेजमध्ये असताना ऐश्वर्यानं सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याशिवाय तिने नाटकातही काम केलं होतं.
-
“२६ मार्च २०२४ आयपीएलसाठी अँकरिंग करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मनामध्ये भीती, दडपण व उत्साह घेऊन मी स्टुडिओमध्ये पोहोचले.” असं ऐश्वर्याने पोस्टमधल्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
-
ऐश्वर्याने असंही म्हणाली की, “अनेक नवीन गोष्टी मला इथे पाहायला मिळाल्या शिकायला मिळाल्या अनेक तांत्रिक गोष्टी समजून घेता आल्या. आता मी खूप उत्सुक आहे माझ्या येणाऱ्या शूटसाठी.” (All Photos- aishwarya_aruna_prakash24)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल