-
रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ चित्रपट २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम रिटर्न्स’ला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. (फोटो सौजन्य : रोहित शेट्टी इन्स्टाग्राम )
-
आता येत्या १५ ऑगस्टला ‘सिंघम अगेन’ अर्थात ‘सिंघम’ चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : रोहित शेट्टी इन्स्टाग्राम)
-
‘सिंघम ३’ मध्ये प्रेक्षकांना अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य : रोहित शेट्टी इन्स्टाग्राम )
-
आता या बहुप्रतीक्षित चित्रपटात एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. (फोटो सौजन्य : रोहित शेट्टी इन्स्टाग्राम)
-
‘पावनखिंड’, ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटांमुळे हा अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला आहे. (फोटो सौजन्य : अंकित मोहन इन्स्टाग्राम )
-
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अंकित मोहन आहे. याबाबत स्वत: पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य : अंकित मोहन इन्स्टाग्राम )
-
अभिनेता अंकित मोहनने ‘फर्जंद’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य : अंकित मोहन इन्स्टाग्राम )
-
अंकित हा अमराठी असून दिल्लीतील चांदनी चौकात तो लहानाचा मोठा झाला. अतिशय संघर्ष करून त्याने मुंबईसारख्या अनोळखी शहरात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. (फोटो सौजन्य : अंकित मोहन इन्स्टाग्राम )
-
अंकित ‘सिंघम ३’ सारख्या बड्या चित्रपटात झळकणार असल्याने सध्या त्याचे चाहते अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (फोटो सौजन्य : अंकित मोहन इन्स्टाग्राम )

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स