-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध माती’चा मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी अर्थात शुभम आणि कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
-
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’च्या गुढीपाडवा विशेष भागात समृद्धीला सूत्रसंचालनात साथ देणार आहे अभिनेता हर्षद अतकरी.
-
यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात.
-
आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहायला मिळत आहे.
-
स्पर्धकांबरोबरच सूत्रसंचालनही जोडीने सादर होत आहे.
-
समृद्धीबरोबरच स्टार प्रवाह परिवारातले कलाकार सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडतात.
-
‘मन धागा धागा’ मालिकेतील सार्थक आणि ‘साधी माणसं’ मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसेल.
-
समृद्धी आणि हर्षदच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे.
-
त्यामुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पहाण्याची संधी ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चा मंच घेऊन आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह आणि समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल