-
मराठी मनोरंजसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने मालिका, चित्रपट, वेब सीरिज करत लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
-
अगदी लहाणपणापासूनच सिद्धार्थचा सांभाळ त्याच्या आईनंच केला.
-
सिद्धार्थ आपल्या नावापुढे त्याच्या आईचं नाव लावतो; ज्या व्यक्तीनं आपल्याला घडवलं तिचंच नाव आपल्या नावापुढे लावावं, असं सिद्धार्थला वाटतं.
-
वडील असूनही ते संपर्कात का नाहीत याबद्दल सिद्धार्थने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
-
“मला माहीत आहे की, माझे वडील आहेत; फक्त मला माहीत नाही की, ते कुठे आहेत आणि मला अजूनही माहीत नाही की ते कुठे आहेत?” असं सिद्धार्थ म्हणाला.
-
लहाणपणापासून ते आतापर्यंत सिद्धार्थच्या वडिलांनी सिद्धार्थशी कधीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भेटण्याचाही प्रयत्न केला नाही, असंही सिद्धार्थनं नमूद केलं.
-
सिद्धार्थ आईबद्दल सांगताना म्हणाला, “माझी आई कुठल्या कुठल्या गावात नाटकाचे दौरे करायची, महिना-महिना नाटकाचे ४०-४५ प्रयोग करून घरी परत यायची आणि मग ते पैसे घरखर्चाला वापरायची.”
-
सिद्धार्थनं स्वत: पुढाकार घेऊन, २३ ऑगस्ट २०२३ रोजी त्याच्या आईचं दुसरं लग्नही लावून दिलं.
-
दरम्यान, सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, अनेक वर्षं एकमेकांना डेट करून, सिद्धार्थ चांदेकरने अभिनेत्री मिताली मयेकरबरोबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. (All Photos- sidchandekar/Instagram)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर