-
आज गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्ष आहे. आज सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
-
मराठी सेलिब्रिटीही गुढीपाडवा साजरा करत आहेत.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात गुढीपाडवा साजरा केला.
-
अपूर्वा गोरे हिनेही पारंपरिक पद्धीने पाडवा साजरा केला आणि इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले.
-
अभिनेत्री अश्विनी महांगडेनेदेखील हिरवी साडी नेसत, नाकात नथ घालून मराठमोळा साज केला.
-
अभिनेता स्वप्निल जोशीनेही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
ठरलं तर मग फेम जुई गडकरीनेही गुढीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
प्रार्थना बेहेरेने खास अंदाजात पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रामधील अभिनेत्रींनी डोंबिवलीत गुढीपाडवा साजरा केला.
-
अभिनेता प्रसाद ओकनेही घरी गुढी उभारली.
-
त्याची पत्नी मंजिरीने पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा केली.
-
प्रसादने मुलाचा गुढीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा खास पद्धतीने साजरा केला.
-
अभिनेत्री रुपाली भोसलेने गुढीबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री सायली संजीवने गुढीची पूजा करतानाचा फोटो शेअर केला आहे. (सर्व फोटो- संबंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”