-
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
-
लग्नानंतर काही काळ माधुरीने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.
-
पुढे, काही वर्षांत नेने कुटुंबीय अमेरिकेहून भारतात परतले आणि माधुरीने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं.
-
अभिनेत्रीचे पती डॉ. नेने सोशल मीडियावर अनेक कौटुंबिक फोटो शेअर करत असतात.
-
नुकतीच त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलला आई-बाबांची मुलाखत घेतली.
-
यावेळी त्यांचे वडील माधव नेने व आई अनु नेने यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगितलं.
-
माधुरी दीक्षितचे सासरे म्हणाले, “मी १९६३ ला इंग्लंडला गेलो त्याआधी आम्ही दादरला शिवाजी पार्क परिसरात राहायचो. माझं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण दादरच्या छबीलदास शाळेत पूर्ण झालं.”
-
तिच्या सासऱ्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर पुढे त्यांनी अभियांत्रिकी पदवीसाठी पुणे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
-
१९६० मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढचं एक वर्ष त्यांनी टाऊन प्लॅनिंग विभागात नोकरी केली.
-
माधव नेने यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी विभागात (civil engineering) पूर्ण झालं आहे.
-
हळुहळू त्यांना परदेशातील शिक्षणाचं महत्त्व समजलं.
-
१९६३ ते १९६५ या कालावधीमध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण केलं.
-
१९६० नंतर पुढे तीन वर्षे नोकरी करून त्यांनी पैसे जमावले आणि इंग्लंड येथील इम्पेरियल महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केला.
-
इंग्लंडमध्ये १९६५ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर ते फक्त एकदाच लग्नासाठी भारतात आले. पुढे लग्न झाल्यावर पत्नीसह ते अमेरिकेत राहू लागले.
-
याशिवाय माधुरीच्या सासूबाईंबद्दल सांगायचं झालं, तर त्यांचं नाव अनु नेने असं आहे.
-
सासूबाई आणि माधुरीमध्ये अतिशय सुंदर नातं असल्याचं त्या दोघींचे सोशल मीडियावरील फोटो पाहून लक्षात येतं.
-
माधुरीच्या सासूबाई अनू नेने शॉर्ट हेअर लूकमध्ये फारच डॅशिंग आणि रुबाबदार दिसतात.
-
त्या शिक्षणाबद्दल सांगतात, “मी उच्चशिक्षित व्हावं ही माझ्या वडिलांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती.”
-
“बीएससीमध्ये पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे मी Law स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ते पूर्ण झाल्यावर मी LTMG हॉस्पिटलला मेडिकल टेक्नोलॉजी करायला जायचे.” असं माधुरीच्या सासूबाईंनी डॉ. नेनेंच्या व्हिडीओमध्ये सांगितलं.
-
‘पंचक’च्या निमित्ताने माधुरी दीक्षितच्या सासरचं संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळालं होतं.
-
दरम्यान, माधुरीसह नेने कुटुंबीयांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं. (सर्व फोटो सौजन्य : डॉ. श्रीराम नेने इन्स्टाग्राम )

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य