-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून ‘येसूबाई’ या नावाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
-
मराठी प्रेक्षकांनी प्राजक्ताला खूप प्रेम दिले.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
प्राजक्ताला गाडी चालवण्याची खूप आवड असून तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून हे ठळकपणे दिसून येते.
-
हीच आवड जपत प्राजक्ताने तिच्या आयुष्यात एक नवा टप्पा गाठला आहे.
-
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्राजक्ताने नवीकोरी कार विकत घेतली आहे.
-
९ एप्रिल २०२४ला प्राजक्ताने ‘ह्युंदाई’ या कंपनीची ‘क्रेटा’ ही कार घेतली आहे.
-
तिच्या या आनंदात तिचे कुटुंबीय तिच्याबरोबर होते.
-
अतिशय पारंपरिक पद्धतीने गाडीसमोर नारळ फोडून तिने गाडीची पूजा केली.
-
यावेळी प्राजक्ताने पैठणी साडीच्या कापडाचा गाऊन ड्रेस घातला होता.
-
“जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा.” असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
-
चाहत्यांनीही प्राजक्ताच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Photos: Prajakta Gaikwad/Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”