-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अभिषेकचा सोशल मीडिया स्टार सोनाली गुरवबरोबर साखरपुडा झाला.
-
गेल्या काही वर्षांपासून अभिषेक गावकर व सोनाली गुरव एकमेकांना डेट करत आहेत.
-
सोशल मीडियावर नेहमी दोघं रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
-
९ एप्रिलला अभिषेक व सोनालीचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
-
साखरपुड्यात अभिषेक व सोनालीने दोन लूक केले होते.
-
विधीसाठी सोनालीने केशरी रंगाची साडी नेसली होती. तर अभिषेक पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला.
-
त्यानंतर अंगठी घालण्याच्या कार्यक्रमाला अभिषेक व सोनाली गोल्डन येलो रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाले.
-
अंगठी घालताना दोघं देखील एकमेकांच्या पाया पडताना दिसले. त्यांची ही कृती पाहून उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
-
साखरपुड्याच्या काही दिवसांपूर्वीच अभिषेक होणारी बायको सोनालीसह गणपती पुळेच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता.
-
दरम्यान, अभिषेकची होणारी बायको प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
-
सोनालीचे इन्स्टाग्रामवर ३ लाख १२ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. (सर्व फोटो सौजन्य – अभिषेक, सोनाली इन्स्टाग्राम आणि फॅन पेज)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”