-
सई ताम्हणकरने अपार मेहनत करून इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
गेल्यावर्षी हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर आता अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केली आहे.
-
गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
-
सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या सईची आणखी एक स्वप्नपूर्ती झाली आहे.
-
अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली.
-
सईच्या या नव्या आलिशान गाडीची किंमत किती आहे माहितीये का?
-
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार सईच्या मर्सिडीज बेंझ या आलिशान गाडीची किंमत १.५ कोटींच्या घरात आहे.
-
गाडी खरेदी करताना सईची आई देखील उपस्थित होती.
-
लेकीचा आनंद पाहून तिची आई देखील भारावून गेल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…