-
काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला.
-
या मालिकेत रमाबाई रानडे यांची लहानपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. तर रमाबाई रानडे यांच्या मोठेपणाची भूमिका स्पृहा जोशीने साकारली होती. या दोघींनाही प्रेक्षकांचं भरभरून कौतुक मिळालं.
-
१० एप्रिलला तेजश्रीच्या घरी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.
-
यानिमित्त स्वामींची पालखी मिळवणूकही काढण्यात आली होती.
-
तेजश्रीने यासंबंधीचे फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
श्री स्वामी समर्थ १८५६ मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगितले जाते. त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केले होते.
-
श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणून ओळखले जातात.
-
दरम्यान, श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त तेजश्रीच्या घरी स्वामींची मनोभावे पूजा करण्यात आली.
-
तसेच त्यांच्या पालखीची मिरवणूकही काढण्यात आली होती.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती