-
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
नृत्याबरोबरच नात्यांचा गोडवा या कार्यक्रमातून अनुभवायला मिळत आहे.
-
या मंचावर आपली कला सादर करणाऱ्या रुचिता आणि सिद्धेश या जोडीने यावेळेच्या भागात लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांच्या आयुष्यावर सुंदर सादरीकरण करुन परिक्षकांची वाहवा मिळवली.
-
सिद्धेश आणि रुचिताच्या या परफॉर्मन्सवर खूश होऊन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि कॅप्टन फुलवा खामकर यांनी त्यांच्या गुरुंनी दिलेले खास घुंगरु भेट म्हणून दिले.
-
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’च्या मंचावरचा हा अतिशय भाऊक क्षण होता.
-
गुरु-शिष्याचं नातं या प्रसंगाने आणखी द्विगुणीत झालं असं म्हणता येईल.
-
सिद्धेश आणि रुचिताने सादर केलेल्या या लावणीने उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं.
-
लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
पोटापेक्षा कलेसाठी नाचणाऱ्या विठाबाई गरोदर असतानाही मंचावर नाचल्या, नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या, स्टेजच्या मागे असणा-या तंबूत जाऊन विठाबाईंनी मुलीला जन्म दिला.
-
बाळाची नाळ दगडाने ठेचून त्या पुन्हा स्टेजवर आल्या आणि पुन्हा नाचायला लागल्या. अशी ही लोककलावंत होणे नाही.
-
विठाबाईंच्या जीवनचरित्राची एक छोटीशी झलक ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’च्या मंचावर पाहायला मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य