-
मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सध्या चर्चेत आहे. (एक्सप्रेस फोटो शंखदीप शर्मा)
-
या अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. (इन्स्टाग्राम व एक्सप्रेस फोटो शंखदीप शर्मा)
-
दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी घरावर गोळ्या झाडल्या. (एक्सप्रेस फोटो शंखदीप शर्मा)
-
या घटनेनंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (एक्सप्रेस फोटो शंखदीप शर्मा)
-
दोन्ही हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो समोर आले आहेत. (फोटो – स्क्रीनशॉट)
-
हल्ला केल्यानंतर हे दोघेही वांद्रे स्थानकावरून उत्तरेकडे गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(फोटो – स्क्रीनशॉट)
-
या हल्ल्याच्या निमित्ताने सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर चर्चेत आहे. हे घर आतून कसं दिसतं ते पाहुयात. (फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
या अपार्टमेंटमध्ये सलमान खानचे दोन फ्लॅट आहे. ग्राउंड फ्लोअर व पहिल्या मजल्यावर हे दोन्ही फ्लॅट आहेत. (फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानचे आई-वडील सलीम खान आणि सलमा खान पहिल्या मजल्यावर राहतात. (फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
तर, सलमान खान ग्राउंड फ्लोअरवर राहतो. तो वन बीएचकेमध्ये राहतो. (फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
सलमानच्या घरात एक छोटं किचन व बेडरूम आहे. (फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
तसेच त्याची जिमही याच फ्लॅटमध्ये आहे. (फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
सलमान बऱ्याचदा त्याच्या या छोट्याशा घरातील फोटो शेअर करत असतो.(फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
सलमान खान त्याच्या घराच्या गॅलरीतून चाहत्यांना भेटायला येतो. (फोटो – सलमान खान इन्स्टाग्राम)
-
नुकतंच ईदच्या दिवशी रणबीर व आलियाने सलमानच्या घरी भेट दिली होती. (फोटो – फिल्मीग्यान)
‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”