-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे.
-
प्राजक्ता ही सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची निवेदिका आहे.
-
प्राजक्ताच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर अनेक जाहिरातीचं फोटोशूट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
-
या व्हिडीओला प्राजक्ताने ‘कर्ज फेडायला करावं लागतं बाबा…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्राजक्ताने कर्जत येथे आलिशान फार्महाऊस खरेदी केले आहे.
-
हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी प्राजक्ताने कर्ज काढले आहे.
-
अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता ही एक व्यावसायिका आहे.
-
‘प्राजक्तराज’ हा प्राजक्ताचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅण्ड आहे.
-
भविष्यात मुंबईत मोठं घरी घेण्याची प्राजक्ताची खूप इच्छा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”