-
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला १९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. अशातच निवडणुकीच्या तीन दिवस आधी अभिनेता आयुष्मान खुरानाने नवीन संसदेच्या वास्तुला भेट दिली आहे.
-
आयुष्मानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नवीन संसदेतील काही Inside फोटोज शेअर केले आहेत.
-
केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्मानची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे.
-
अभिनेत्याने ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवीन संसदेच्या वास्तुला भेट दिली आहे.
-
“संसदेला भेट देणं ही सन्मानाची गोष्ट आहे. देशाचा नागरिक या नात्याने मी हा क्षण कधीच विसरणार नाही. हा अनुभव समृद्ध करणारा होता” असं कॅप्शन अभिनेत्याने संसदेतील फोटो शेअर करत लिहिलं आहे.
-
आयुष्मान पुढे लिहितो, “ही भव्य इमारत पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतो, यात आपल्या देशाचा वारसा, संस्कृती आणि सन्मानाचं दर्शन घडतं. जय हिंद!”
-
काही दिवसांपूर्वीच तरुण पिढीला मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने आयुष्मान खुरानाची निवड केली होती.
-
सध्या आयुष्मानने शेअर केलेले नवीन संसदेतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्यावर्षी तो अनन्या पांडेबरोबर ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात झळकला होता. आता लवकरच तो ‘बधाई हो २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : आयुष्मान खुराना इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”