-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात.
-
सोशल मीडियावर मिलिंद गवळी खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.
-
काही दिवसांपूर्वी मिलिंद यांनी एक पोस्ट शेअर केली होती; ज्यामधून त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
-
मिलिंद यांनी ‘मराठा बटालियन’ चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर केलेल्या एका सीनचा अनुभव सांगितला.
-
मिलिंद यांनी या सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
मिलिंद म्हणाले, “लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर ‘मराठा बटालियन’मध्ये काम करायची संधी मिळाली. या सिनेमांमध्ये मला अमर भोसलेच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं.”
-
लक्ष्मीकांत बेर्डेंवर ओरडण्याचा सीन हा मिलिंद गवळींचा चित्रपटातला पहिलाच सीन होता. म्हणाले, “मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्यांच्यावर ओरडायचं होतं.”
-
“पहिलाच दिवस, पहिला सीन. नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग, दडपण आलं होतं,” असं मिलिंद यांनी सांगितलं.
-
पुढे अभिनेते म्हणाले, “पण कदाचित लक्ष्मीकांत बेर्डेंना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी “आपण रिहर्सल करूया”, असं मला सांगून, मला कंफर्टेबल केलं.”
-
हा सीन झाल्यानंतर सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंनी मिलिंद यांच्या कामाचं कौतुक केलं.
-
“अख्या शूटिंगभर हसत-खेळत, मजा-मस्ती करत हा ‘मराठा बटालियन’ लक्ष्मीकांत बेर्डेंनी पूर्ण केला होता”, असं मिलिंद गवळींनी सांगितलं.
-
सर्व फोटो सौजन्य – मिलिंद गवळी इन्स्टाग्राम

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”