-
भाजपा नेते व अभिनेते रवी किशन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. (फोटो – रवी किशन इन्स्टाग्राम)
-
रवी किशन आपले पती आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला मुलगी आहे, असा दावा या महिलेने केला आहे. (फोटो – रवी किशन इन्स्टाग्राम)
-
या महिलेने आपल्या २५ वर्षीय शिनोवा नावाच्या मुलीला सोबत घेत पत्रकार परिषदेत हा दावा केला. या मुलीनेही रवी किशन आपले वडील असल्याचा दावा केला आहे. (फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट व इन्स्टाग्राम)
-
महिलेच्या या दाव्यानंतर तिच्या व तिच्या कुटुंबाविरोधात रवी किशन यांच्या पत्नी प्रीती शुक्लांनी लखनऊमध्ये तक्रार दिली आहे. या महिलेने २० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (फोटो – रवी किशन इन्स्टाग्राम)
-
शिनोवा नावाच्या या मुलीने रवी किशन व आपली डीएनए चाचणी करण्यात यावी अशी मागणी आज तकशी बोलताना केली आहे. (फोटो – रवी किशन इन्स्टाग्राम)
-
अशातच बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान याने त्याच्या एक्स अकाउंटवरून रवी किशन यांचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ते आरोप करणाऱ्या या महिलसह व मुलीसह दिसत आहेत. (फोटो – रवी किशन इन्स्टाग्राम)
-
“रवी किशन स्वीकारत नसलेल्या मुलीबरोबरचे त्यांचे फोटो,” असं कॅप्शन देत केआरकेने हे फोटो शेअर केले आहेत. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
केआरकेने शेअर केलेल्या फोटोंमुळे खळबळ उडाली आहे. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
या महिलेने १९९६ मध्ये रवी किशन यांच्याशी लग्न केल्याचा दावा केला होता. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत आपण रवी किशन यांच्याशी लग्न केलं होतं, असा दावा तिने केला आहे. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
केआरकेने एक्सवर एकूण १२ फोटो शेअर केले आहेत. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
हे फोटो रवी किशन, अपर्णा ठाकुर व शिनोवा यांचे असल्याचं त्याने म्हटलं आहे. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
अपर्णा ठाकुरच्या आरोपांनंतर प्रीती शुक्ला यांनी तक्रार दिली आहे. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
मात्र स्वतः रवी किशन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
त्यामुळे या प्रकरणात काय खोटं आणि काय खरं, याबाबत संभ्रम आहे. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
अपर्णा ठाकुर नावाच्या महिलेने केलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे रवी किशन यांच्या प्रतिक्रियेनंतरच स्पष्ट होईल. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
-
रवी किशन यांची कथित मुलगी शिनोवा ही अभिनेत्री आहे. (फोटो – कमाल आर खान एक्स अकाउंट)
५ एप्रिल पंचांग: दुर्गाष्टमीला कोणत्या राशीवर होणार माता लक्ष्मीची अपार कृपा; कोणाच्या पदरी पडणार सुख, शांती आणि धन; वाचा तुमचे राशिभविष्य