-
माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘हे मन बावरे’, ‘तू तिथे मी’ या मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत लोकप्रिय झाली.
-
वैयक्तिक आयुष्यात २०१६ मध्ये अभिनेत्री विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर काही वर्षे छोट्या पडद्यावर काम करून पुढे, मृणाल अमेरिकेला गेली.
-
मृणाल दुसानिस आता जवळपास ४ वर्षांनी पुन्हा एकदा मायदेशी परतली आहे. यावेळी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत खुलासा केला आहे.
-
मृणाल सांगते, “मला जेव्हापासून समज आली तेव्हापासून कायम मला मालिकांमध्ये काम करायचंय असं वाटायचं.”
-
मृणाल दुसानिसने पत्रकारितेत तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.
-
याशिवाय अभिनेत्रीने अभ्यासाचा भाग म्हणून एका नामांकित वृत्तपत्रात व त्यानंतर एका वृत्तवाहिनीमध्ये देखील काम केलं.
-
अभ्यास पूर्ण करताना मृणालला कॉलेजमध्येच मालिकेच्या ऑडिशनबद्दल समजलं.
-
याबद्दल अभिनेत्री सांगते, “खरंतर मी एका वेगळ्या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. ती मालिका नंतर आलीच नाही. त्यामुळे मी रितसर पत्रकारितेमध्ये काम करायचं असं ठरवलं होतं. पण, ती ऑडिशन पाहून मला ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’साठी फोन आला.”
-
“झी मराठीकडून फोन आल्यावर मी त्या ठिकाणी गेले, लगेच दुसऱ्या दिवशी आमचं फोटोशूट झालं आणि मालिकेचे प्रोमो शूट झाले अशाप्रकारे माझी पहिली मालिका मला मिळाली.” असं मृणाल दुसानिसने सांगितलं. ( सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम )
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल