-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
येत्या २२ एप्रिलपासून स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘सुख कळले’ मालिका रात्री ९ वाजता प्रसारित केली जाणार आहे.
-
त्यामुळे दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
शनिवारी ( २० एप्रिल ) रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील राज-कावेरीच्या जोडीला गेली दोन वर्षे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
-
४ एप्रिल २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
तन्वी मुंडले, विवेक सांगळे, निवेदिता सराफ या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या.
-
शूटिंगच्या शेवटच्या दिवसाच्या पार्टीला सगळेच कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ( सर्व फोटो सौजन्य : तन्वी मुंडले व कलर्स मराठी वाहिनी इन्स्टाग्राम )

VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल