-
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, स्वप्नील जोशी आणि सारंग साठ्ये यांच्या मुख्य भूमिका आहे.
-
सध्या या चित्रपटातील सर्व कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वांनी मराठमोळा लूक केला आहे.
-
फॅशन डिझायनर केतकी शाहच्या ‘K2FashionCloset’ ब्रॅण्डच्या इन्स्टाग्राम पेजवर ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील कलाकारांचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रींनी खणाचं परकर पोलकं परिधान केले आहे.
-
या खणाच्या कपड्यांवर ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या नावाची एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
-
बालकलाकार मायरा वायकुळचा खणाच्या परकर पोलक्यातील सुंदर लूक.
-
‘नाच गं घुमा’ हा चित्रपट बुधवारी, १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट झाली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नाच गं घुमा आणि केतकी शाह/इन्स्टाग्राम)

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?