-
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेतून अभिनेत्री अनघा अतुल घराघरांत लोकप्रिय झाली.
-
अनघाने मालिकेत श्वेता हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं.
-
अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक आहे.
-
आज वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अनघाने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.
-
“Happy Birthday बाबा! तुम्हें और क्या दूँ मैं दिल के सिवा तुमको हमारी उमर लग जाए” फोटोंना असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अनघासह तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी सुद्धा भगरे गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
ऋतुजा बागवे, सिद्धार्थ बोडके, रेश्मा शिंदे, तितीक्षा तावडे या कलाकारांनी अनघाने शेअर केलेल्या फोटोंवर खास कमेंट्स केल्या आहेत.
-
या सगळ्या फोटोंमध्ये वडील आणि मुलीचं सुंदर असं नातं पाहायला मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल इन्स्टाग्राम )

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच