-
सध्या चिन्मय मांडलेकर हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. याच कारण त्याच्या मुलाचं नाव.
-
चिन्मयने लेकाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे सध्या त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतं आहे. पण हे पहिल्यांदाच घडलेलं नाही.
-
याआधी चिन्मयला मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून ट्रोल करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस अभिनेत्याने नाव ठेवण्यामागचा हेतू स्पष्ट केला होता.
-
पण तरीही अलीकडेच चिन्मयने एका पॉडकास्टला मुलाखत दिल्यानंतर त्याला मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून खूप ट्रोल करण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्याच्यासह कुटुंबाला देखील ट्रोल केलं गेलं.
-
ट्रोलिंगनंतर चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून नेहाने ‘जहांगीर’ नावाच्या अर्थासह मुलाचं नाव का ठेवलं? याची माहिती दिली.
-
नेहा म्हणाली, “माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ला झाला होता.”
-
“२१ मार्चला जमशेदी नवरोज असतो. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे,” असं नेहा म्हणाली.
-
नेहा पुढे म्हणाली,”‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत.”
-
“शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी कुटुंब संस्था आहे. त्यामुळे ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला”, असं स्पष्ट नेहा जोशी-मांडलेकरने सांगितलं.
-
नेहाच्या या व्हिडीओनंतर चिन्मयने त्याच्या दुसऱ्यादिवशी मोठा निर्णय घेतला.
-
“छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत या भूमिकेची मी रजा घेतो” असं चिन्मयने जाहीर केलं.
-
चिन्मयच्या या निर्णयावर अनेक कलाकारांमंडळींसह चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. (सर्व फोटो सौजन्य- चिन्मय मांडलेकर इन्स्टाग्राम आणि नेहा जोशी-मांडलेकर इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख